1990 च्या विधानसभेसारखी बनली राजकीय परिस्थिती चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत वाढली चुरस

Foto

औरंगाबाद: लोकसभा मतदार संघात 23 उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी लढत चार प्रमुख उमेदवारांमध्ये होणार आहे. निवडुक ही जाती धर्माच्या मतदान गणितावर अवलंबुन असते. 1990 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पश्‍चिम मतदार संघात शेवटच्या क्षणाला मतदान जात धर्मावर विभागले गेले. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात यंदा 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा नशिब आजमावत आहेत. काँग्रेस महाआघाडीकडून आ. सुभाष झांबड परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आ. इम्तियाज जलील तर शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे हर्षवर्धन जाधव विद्यमान खासदार खा. खैरे यांना पराभूत करण्याच्या इर्शेने रिंगणात उतरले आहेत. 


त्यामुळे निवडणुक चुरशीची होणार आहे. कोण निवडून येणार याबाबत कोणीही छातीठोकपणे सांगु शकणार नाही. 1990 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत खैरे निवडणूक रिंगणात होते. तर काँग्रेस पक्षाने त्यावेळी गंगाधर गाडे यांना उमेदवारी दिली होती. दलित आणि मुस्लिम मतदान काँग्रेस आघाडीचे पारंपारिक मतदान आहे. त्यामुळेे गाडे यांना उमेदवारी दिली होती. पण त्यावेळेस शहरातील मुस्लिम मतदारांनी गाडे यांना मतदान करण्याऐवजी एक गठ्ठा मतदान अपक्ष उमेदवार जावेद हसन खान यांना पडली होती. मतदानाच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम मतदारांनी जावेद खान यांच्या पारड्यात मते टाकली होती. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. 23 मे रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी सात मुस्लिम उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी मुस्लिम समाज ऐनवेळी काय निर्णय घेतो हे पाहण्यासारखे आहे.